टीम महाराष्ट्र देशा : शरद पवारांची भेट घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे निघाले आहेत . केवळ 15 ते 20 मिनिटे राज आणि पवारांमध्ये चर्चा झाली आहे. बंद दरवाज्याआड या उभय नेत्यांची चर्चा झाली. अजित पवारही उपस्थित होते, मात्र भेटीचा तपशील गुलदस्त्यात आहे.
दरम्यान , राज ठाकरे यांनी काल काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला उघड पाठिंबा दिला नसला, तरी अप्रत्यक्षरित्या आघाडीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची आजची शरद पवार यांच्यासोबतची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतली आहे मात्र भाजपचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. पवारांच्या मार्गदर्शनाखालीच राज यांची सध्या वाटचाल सुरु असून या भेटीत नेमकी काय चर्चा होतेय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात टीका केली होती.बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन शोधून काढतात, त्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्यांच्या तोंडून बोलवून घेतात, असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला होता. ज्यांना एक नगरसेवकही निवडून आणता येत नाही, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. राज ठाकरे यांनी सुपारी घेतली असून पुढील काही दिवस ते असेच बोलणार असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

