Share

सीबीआयचे सरकारला पत्र, पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची मागितली परवानगी

Published On: 

🕒 1 min read

पुणे: पुणे-सातारा मार्गावरील रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरकडून टोलवसुली केली जात आहे, ती बेकायदेशीर आहे. ही टोलवसुली नियमांचे उल्लंघन करणारी आहे. अशी तक्रार आरटीय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी सीबीआयकडे केली होती.आता त्यावरूनच सीबीआयाने राज्य सरकारला पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची परवानगी द्या, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवले आहे.

सदरील टोलनाक्यावर १ जानेवारी २०१६ पासून टोलवसुली सुरु आहे. जी अनधिकृत आहे. याविरोधात सीबीआयने प्राथमिक चौकशी केली आहे. मात्र नियमात बदल झाल्याने सीबीआयने गुन्हा नोंदवन्यासाठी राज्य सरकारची परवानगी मागितली आहे. एवढी मोठी फसवणूक इतक्या महिन्यांपासून चालू असताना गेल्या दोन -तीन महिन्यांपासून राज्य सरकार सीबीआयला परवानगी न देता अडून बसले आहे. अशी माहिती आरटीय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी दिली आहे.

दरम्यान सीबीआयकडून सरकारला परवानगीसाठी पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणावर तपासणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!