लातूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेे आहे. या नुकसानीची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गावांत एकाच दिवशी ग्रामसभा घेऊन नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
लातूर जिल्ह्यात सुरवातीच्या काळात पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर अधूनमधून पाऊस होत राहिला. या पाण्यावरच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. जे पीक काढणीला आले होते त्यामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात होते.
अतिवृष्टीने या सर्व पिकांसह काढणीस आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपनी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून अडवणूक करण्याची भूमिका घेत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी निलंगेकर यांच्याकडे असताना त्यांनी तत्काळ संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावून वरील आदेश दिले.
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना फॅक्सद्वारे एक आदेश दिला आहे. लातूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या हेतूने एकाच दिवशी ग्रामसभा घेण्यात येऊन पंचनामे करावेत. सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तक्रारीची दखल घ्यावी. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीने शेतकरी कोलमडून पडले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कागदपत्रे मागून पिळवणूक न करता सरसकट पंचनामे करावेत. लातूर जिल्ह्यातील एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, आशा सूचना ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192731373682868225?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192731196909744128?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

