🕒 1 min read
मुंबई : देशासह राज्यात आजपासून (शनिवार) लसीकरणाला सुरुवात होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनेशनची उद्घाटन केल. यापूर्वी त्यांनी म्हटले की, कोरोनाची व्हॅक्सीन खूप कमी वेळात आली आहे. जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू होत आहे. यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. देशाला संबोधीत करत असताना मोदी भावुक झाले होते.
India begins the world’s #LargestVaccineDrive. This is a day of pride, a celebration of the prowess of our scientists and hardwork of our medical fraternity, nursing staff, police personnel and sanitation workers.
May everyone be healthy and free from illness. pic.twitter.com/AEpMMEAyzR
— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिली जाणार आहे. राज्यात पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० प्रमाणे सुमारे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आलं आहे. ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांना काल सायंकाळपर्यत मेसेज पाठविण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे आत सर्वांची नजर ही लसीकरण मोहीमेवर असणार आहे.
सर्व 29 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या 3006 साइट्सवर एकाच वेळी हा कार्यक्रम सुरु होता. पहिल्या टप्प्यात हेल्थवर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस दिली जाईल. पहिल्या दिवशी प्रत्येक साइटवर कमीत कमी 100 लोकांना लस दिली जाईल. मात्र यामध्ये एक महत्वाची गोष्ट अधोरेखित करण्यात आली आहे. ती म्हणजे पहिली कोरोना लस घेतल्या नंतर लसीचा दुसरा डोस घेणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे ‘पहिला डोस घेतला व नंतरचा डोस घेणं विसरले, अशी चूक करू नका. जसे की तज्ज्ञं सांगत आहेत, पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिनाचे अंतर ठेवले जाईल. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे, दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यानंतरच तुमच्या शरिरात करोनाच्या विरोधात लढण्यासाठीची आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. त्यामुळे लसीकरण होताच तुम्ही बेजबाबदारपणे वागायला लागला, मास्क काढून ठेवलं, सुरक्षित अंतर ठेवणं विसरलात…तर काही उपयोग होणार नाही.’ अस आवाहन यावेळी पंतप्रधान मोदींनी केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत आहे’
- ईशान्य भारताच्या गावागावात रिपब्लिकन पक्षाची सदस्य मोहिम सुरू आहे – रामदास आठवले
- ‘युध्दनिपुण, प्रकांड पंडित छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला आणि शौर्याला मानाचा मुजरा’
- शिक्षणाचा रोड मॅप तयार करा,शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
- महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ, वेण्णा लेक परिसराचा होणार संपूर्ण कायापालट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

