Share

पुणे दुर्घटनेची सखोल चौकशी करा ; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटे २ वाजताच्या सुमारास कोंढव्यातील तालाब कंपनी समोर घडली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले आहेत.

या दुर्दैवी घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून या घटनेला जबाबदार कोण यावरुन प्रश्न निर्माण झालेला आहे. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून संवेदना व्यक्त केली. असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

दरम्यान, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी ‘झोपड्यांशेजारील बांधकामामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. बांधकाम व्यवसायिकाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना दुसरा निवारा उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर त्यांना इतर मदत केली जाईल’ असं आश्वासन देण्यात आलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!