मुंबई : भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा विडा उचलला आहे. त्याप्रमाणे त्यांनी अनेक नेत्या, मंत्र्यांवर आरोप केले आहेत. आता त्यांंनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर
जरंडेश्वर कारखान्यावर अनेक शेतकऱ्यांचे व कामगारांचे संसार अवलंबून असून, कारखान्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. माध्यमांद्वारे कारखाना बंद पाडण्याची भाषा करत अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या किरीट सोमय्यांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सोमय्या यांनी त्यांचे राजकारण बंद करावं नाही तर, सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा चिमणगाव, कुमठे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिला आहे. किरीट सोमय्या हे राजकीय द्वेषापोटी जरंडेश्वर कारखान्यावर येत आहेत. या कारखान्याने हजारो हेक्टर ऊस गाळपास आणून एफआरपीप्रमाणे, तर कधी त्याहीपेक्षा अधिक दर दिला आहे.
आसपासच्या गावांना ‘सीएसआर’मधून मदत करत आहेत. पूर्वी अडीच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असताना ऊस गाळपास घालवण्यासाठी शेतकरी हवालदिल होत असत. या पार्श्वभूमीवर सध्याच्या व्यवस्थापनाने नियोजनबद्ध विस्तारीकरण केल्याने कोरेगावसह लगतच्या चार- पाच तालुक्यांना फायदा झाला आहे. असे शेतकरी, कामगारांच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता भाजपच्या सगळ्या ताई, माई, अक्का, भाऊ तोंडाला कुलूप ठोकून बसलेत- संजय राऊत
- ब्रेकिंग : अखेर मंदिरांची दारे उघडणार; मुख्यमंत्री ठाकरेंनी केली तारखेची घोषणा
- आरोग्य विभागाची होणारी परीक्षा पुढे ढकलली! मनस्तापाबद्दल माफी मागतो, आरोग्य मंत्र्यांची प्रतिक्रिया
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं; खुद्द अजित पवार यांनी दिली कबुली


