Share

बीज कंपन्यांवर कारवाई करा; राष्ट्रवादी काँग्रेसची कृषी मंत्र्यांकडे मागणी

Published On: 

मुंबई : अनेक कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवत नसल्याने मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे पंचनामे करून बीज कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आज करण्यात आली.

फडणवीस आणि मला कुठलीही टोपण नाव ठेवता ? हे चालत का – पाटील

मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली आहे. मात्र अनेक कंपन्यांचे बियाणे उगवत नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावल्याची बाब राष्ट्रवादीने निवेदनाद्वारे कृषीमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील,सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.

दरम्यान, राज्य सरकारने अनुदान थांबविल्याने महाबीजने यंदा महागात बियाणे विकले आणि हे महाग बियाणे खरेदी करून सुद्धा ते बोगस निघाले. यामुळे शेतकर्‍यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्रातून केली आहे.

अखेर सलून सुरु करण्यास ठाकरे सरकारची मिळाली परवानगी

दरम्यान, यंदा बोगस बियाण्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. प्रचंड परिश्रमाने पेरणी केल्यानंतर बियाणे उगविलेच नसल्याने आता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्याला दुबार पेरणीसाठी तातडीने मदत करणे आवश्यक आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या जीवनाशी खेळणारे महाबीजचे दोषी अधिकारी आणि या बोगस बियाणे कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!