Share

अखेर सलून सुरु करण्यास ठाकरे सरकारची मिळाली परवानगी

Published On: 

मुंबई : गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद असलेल्या सलून चालकांना अखेर दिलासा मिळाला आहे. २८ जूनपासून सलून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहेअशी माहिती शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सलूनमध्ये चालकांना फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दाढी करण्यासाठी अजून परवानगी देण्यात आली नाही.

अनिल परब यांनी निर्णयाबद्दल बोलताना सांगितलं की, “२८ जूनपासून सलून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सलूनमध्ये फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, दाढी करण्यासाठी परवानगी नाही. सोबतच केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. ब्युटीपार्लर, स्पा आणि जीमबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. थोडे दिवस पाहणी करुन नंतर पुढील निर्णय घेतला जाईल”.

सलून आणि ब्युटी पार्लर चालकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

नाव घेतल्याने कोणी हिंदूह्रदयसम्राट होत नाही, अनिल परबांनी लगावला मनसेला टोला

अनलॉक १ : राज्यात ३० जूनपर्यंत ‘हे’ सर्व बंदच राहणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!