बीड – बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.
मंत्र्यांच्या बचावासाठी योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन कथित कॉल रेकॉर्डिंग्सची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, चौकशी झाल्याशिवाय आरोप करून एखाद्याला आयुष्यातून उठवणं बरं नाही. भाजपची सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे काहीही घडलं की महाविकास आघाडी बदनाम कशी होईल, यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करत आहे,’ अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
दुसरीकडे या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या समर्थनार्थही अनेकजण पुढे येत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या काळवटी तांडा येथील सरपंच यांनी भाजपावर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.सरपंच कमल नाथराव चव्हाण यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंगळवारी राजीनामा पाठवून संजय राठोड यांचे समर्थन केले आहे.लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या पत्रात म्हटलंय की, मी कमल नाथराव चव्हाण काळवटी, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील सरपंच म्हणून मी माझ्या भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा देत असून त्याचा स्वीकार करण्यात यावा. राजीनाम्याचं कारण म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपा पक्षामधील नेते वेळोवेळी महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व व बंजारा समाजातील उच्च पदस्थ लोकनेते संजय राठोड यांना संपविण्याचे कटकारस्थान करत असल्याचं मला जाणवत आहे त्यामुळे मी राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जवळजवळ बाटलीबंद होत आलेले कोरोनाचे भूत पुन्हा बाहेर येते की, काय ?’
- कुमारस्वामींनंतर आता सिद्धारामैय्यांचा देखील राम मंदिराला देणगी देण्याला विरोध
- टूलकिट प्रकरणात नवनवीन नावांचा समावेश; अनिता लाल पोलिसांच्या रडारवर
- Toolkit Case: आरोपी शांतनुला तात्पुरता अटकपूर्व जामीन, दिशालाही मिळाला ‘हा’ दिलासा
- नामांकित उद्योजकाला महिलेसह दोघांची खंडणीची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

