औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील व शहरातील शासन मान्य स्वस्त धान्य राशन दुकानदार हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रति व्यक्ती पाच किलो धान्य न देता केवळ तीन किलो गहू व तांदूळ देत आहेत. त्यामुळे आता राशन दुकानदारांवर कठोर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी रिपब्लिकन सेनेतर्फे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
देशामध्ये कोरोना महामारीचे संकट उद्भवल्यामुळे केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दोन महिन्यांचे राशन गहू व तांदूळ प्रति व्यक्ती पाच किलो याप्रमाणे वाटप करण्याचे आयोजन केले आहे. मात्र राशन दुकानदार त्याला हरताळ फासत असून गोरगरिबांची अक्षरशः लूट करून प्रति व्यक्ती फक्त तीन किलो याप्रमाणे याप्रमाणे राशन देत आहेत. राशन दुकानदार धान्य वितरणाची पावती न देता मनमानी कारभार करत आहे व सामान्य नागरिकांची दिशाभूल करून लूट करत आहेत. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रतिव्यक्ती गहू व तांदूळ पाच किलो याप्रमाणे वितरित करण्यात यावी.
व त्याची रीतसर पावती ग्राहकांना देण्यात यावी तसेच सर्व दुकानासमोर मोठे बोर्ड लावून शासन नियमाप्रमाणे जे तांदूळ, गहू वितरित करण्याचे ठरले आहे. त्याप्रमाणे ठळक अक्षरात बोर्ड लावण्यात यावा. तांदूळ, गहू यांची काळ्या बाजारात होणारी विक्री जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर पक्ष मराठवाडा संघटक आनंद कस्तुरे, जिल्हाध्यक्ष सिद्धोधन मोरे, जिल्हा सचिव रामराव नरवडे, सचिन शिंगाडे, मुकुंद सातदिवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारचा यू-टर्न; पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय मागे
- औरंगाबादेत आजचा दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक! लसीकरण पुन्हा बारगळण्याची शक्यता
- ‘हिंदूंचा अपमान करणाऱ्यांवर बहिष्कार टाका’, रामदेव बाबांचे आवाहन
- ‘राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार’- अमित देशमुख
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार !

