नवी दिल्ली : कोरोना काळात अफवा आणि संभ्रम पसरवल्याचा आरोप भाजपने काँग्रेसवर केला आहे. देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमा खराब करण्यासाठी काँग्रेस टूलकिटचा वापर करत असल्याचा आरोप भाजप नेते संबित पात्रा यांनी काल केला होता.
भाजप नेते आणि मंत्र्यांनी काँग्रेसवर टूलकिटचे आरोप करणारे पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेत. यात काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘Indian Stain’ आणि ‘Modi Strain’ असे शब्द वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यासोबत कुंभ मेळ्यातून कोरोनाचा प्रसार झाल्याचा उल्लेख करण्यास सांगितल्याचा आरोपही भाजपा नेत्यांनी केला आहे. राहुल गांधी रोज करत असलेलं ट्वीटही टूलकिटचा भाग असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
आता या सगळ्या वादामध्ये योगगुरु रामदेव बाबा यांनीही उडी घेतली आहे. रामदेव बाबा यांनी यासंदर्भात बोलताना हे हिंदूंच्या बदनामीचं षड्यंत्र असल्याचं मोठं विधान केलं आहे. रामदेव बाबा यांनी काँग्रेसचे नाव न घेता टीका केली आहे.
Defaming Kumbh Mela & Hinduism through Toolkit is a social, cultural & political conspiracy & crime. I request people doing this that they can do politics but don't insult Hindus. This country won't forgive you. I appeal to people to boycott & oppose such forces: Yog Guru Ramdev pic.twitter.com/wpPTYbs4U5
— ANI (@ANI) May 19, 2021
रामदेव बाबा म्हणालेत की, ‘टूलकिटद्वारे कुंभमेळा आणि हिंदूत्वाची बदनामी करणे हा एक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कट आणि गुन्हा आहे. हा गुन्हा करणाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी जरुर राजकारण करावे. पण, हिंदूंचा अपमान करू नये. हा देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही. अशा शक्तींना बहिष्कृत टाकण्याचे तसेच विरोध करण्याचे आवाहन मी हिंदूंना करतो.’
टूलकिट म्हणजे काय?
जगाच्या वेगवेगळ्या भागात सातत्यानं आंदोलन होत असतात. मग ते अमेरिकेतील black lives matter असो वा लॉकडाउन विरोधी आंदोलन. पर्यावरणाशी निगडित climate strike campaign असो किवा इतर आंदोलन. अशा स्वरूपाची आंदोलन करताना त्याचा एक कृती कार्यक्रम तयार केला जातो. आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर नेणं वा तीव्र करणं करण्याच्या उद्देशानं हे तयार केलं जातं. ज्यामध्ये हा कृती कार्यक्रम नोंदवण्यात येतो, त्याला टूलकिट असं म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनात या टुलकिटचा वापर केल्याचे समोर आले होते.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट मात्र मृत्युदर कायम
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील कोरोनाचा आढावा घेणार
- पुलाखाली आढळला युवकाचा मृतदेह; बोरगावात एकच खळबळ
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर

