मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारीची कारवाई सुरु आहे. गुरुवारी संध्याकाळी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा मारला. मुंबईतील नरिमन पॉईंटच्या कार्यालयावर छापेमारीची कारवाई झाली. अजित पवार आणि त्यांच्या 3 बहिणीच्या कारखान्यांवर सकाळपासून छापेमारीची कारवाई सुरु आहे. त्या बद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि अजित पवारांच्या बहिण सुप्रिया सुळे यांनी आयकर विभागाच्या छाप्यावर प्रतिक्रिया दिली. ‘दिल्लीने कितीही त्रास दिला तरीही महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यावर भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदिप गावडे यांनी सुळेंना चांगलंच सुनावलं आहे.
महाराष्ट्राला तुमच्या घराची जहागीर समजले की काय? सुप्रिया ताई, स्वत: घोटाळे करुन हजारो कोटींची बेनामी संपत्ती करायची आणि कारवाई झाल्यावर रडत बसायचं बास करा ही नाटकं, असं म्हण प्रदिप गावडे यांनी सुळेंना सुनावलं आहे.
कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पुढे झुकणार नाही – सुप्रिया सुळे
महाराष्ट्रला काय तुमच्या घरची जहागीर समजले की काय @supriya_sule ताई, स्वतः घोटाळे करून हजारों कोटींची बेनामी संपत्ती करायची आणि कारवाई झाल्यावर रडायचे बास करा हे नाटकं..!@KiritSomaiya
— Adv. Pradip Gavade (@PradipGavade) October 8, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार; राणेंचा घणाघात
- लवकरचं ‘दूध का दूध पानी का पानी होईल; अजितदादांची प्रतिक्रिया
- ‘आता राष्ट्रवादीवाले बॉलिवूडची पण भांडी घासायला लागले’, निलेश राणेंचा घणाघात
- ‘लखीमपुर घटनेवर मी प्रतिक्रिया दिली या रागातून सत्ताधाऱ्यांनी ‘ती’ कारवाई केली असावी’
- १०५ आमदार असूनही ते एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करतात; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं


