मुंबई : यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सर्व संघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पात्रता फेरीत, नेदरलँड आणि झिम्बाब्वे या संघांनी शुक्रवारी उपांत्य फेरीचे सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचे तिकीट निश्चित केले आहे. यंदाचा टी-२० विश्वचषक १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. ग्लोबल क्वालिफायर ए आयर्लंड आणि युएइ पात्र ठरले आहेत.
ग्लोबल क्वालिफायर बी द्वारे टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये पोहोचलेल्या दोन संघांची नावे समोर आली आहेत. उपांत्य फेरीच्या सामन्यात झिम्बाब्वेने न्यू पापुआ गिनीचा २७ धावांनी पराभव केला. त्याचवेळी दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सने अमेरिकेच्या संघावर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दोन्ही संघांनी फायनलमध्ये प्रवेश केल्याने त्यांनी विश्वचषक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पात्रता फेरी गाठणारे संघ मुख्य स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी गट सामने खेळतील. सुपर १२ मध्ये पोहोचणाऱ्या संघाशी स्पर्धा करण्यासाठी आठ संघांमध्ये लढत होणार आहे. १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत फक्त आयसीसी क्रमवारीत अव्वल १२ मधील संघांना मुख्य सामन्यात थेट प्रवेश मिळाला आहे. उर्वरित चार संघ क्वालिफायर सामन्यांनंतर ठरवले जातील.
The last team to qualify for the ICC Men's #T20WorldCup 2022 ????
See you in Australia, @ZimCricketv ????
More ???? https://t.co/OsuciyMrAR pic.twitter.com/q94G2PFlef
— ICC (@ICC) July 15, 2022
Australia calling ????
Netherlands have booked their spot in the ICC Men's #T20WorldCup 2022 ???? pic.twitter.com/lPJLQhrOCe
— ICC (@ICC) July 15, 2022
सुपर १२ संघ
ऑस्ट्रेलिया, भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, नामिबिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज
ग्लोबल A च्या पात्रता (आयर्लंड आणि युएइ)
ग्लोबल बी क्वालिफायर (झिम्बाब्वे आणि नेदरलँड)
महत्वाच्या बातम्या :
- harad Pawar : “…तर मी नवीन सरकारचे अभिनंदन केले असते”, शरद पवारांचे वक्तव्य
- T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू म्हणतोय,“युझवेंद्र चहल टी-२० विश्वचषकात भारतासाठी…”
- Devendra Fadnavis : “ज्यांनी फुटकी कवडी दिली नाही, त्यांना पेट्रोल-डिझेलवर बोलण्याचा…”, फडणवीसांनी विरोधकांना सुनावले
- Clyde Crasto : “फडणवीसांनी लक्षात ठेवावे, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली पण…”, राष्ट्रवादीचा टोला
- खराब कामगिरीच्या दबावामुळे ‘या’ भारतीय दिग्गज खेळाडूंनी केली होती अचानक निवृत्तीची घोषणा; वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

