पुणे- संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘पुनश्च हरिओम’ चा नारा दिला. परंतु या पुनश्च हरिओम च्या नाऱ्यामध्ये मध्ये ज्ञानार्जनाची पवित्र ठिकाणी असणारे अभ्यासिका बंद आहेत.
राज्य शासन राज्यात आस्थापने, व विविध ठिकाणे सुरू करण्यासाठी आग्रही आहे. मात्र अभ्यासिका व ग्रंथालय सुरु करण्याबाबत उदासीन आहे. ‘ज्ञानालये बंद पण मद्यालये सुरु’ अशी स्थिती सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे. यातून राज्याची दिशा कुठे चालली आहे हे लक्षात येते. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? हा प्रश्न विचारण्याची वेळ पुन्हा आली असल्याचे मत अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी म्हटले आहे.
राज्यातील ग्रंथालय, अभ्यासिका तात्काळ चालू करावी या आशयाचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे. राज्यात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत याचबरोबर महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा (MPSC) व संघ लोकसेवा आयोग (UPSC) अशा विविध परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी ग्रंथालय व अभ्यासिकांची गरज असताना राज्य सरकार याबाबत उदासीनता बाळगून आहे. हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी शासन परवानगी देत आहे. परंतु ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्यासाठी शासन परवानगी का देत नाही? असा संतप्त सवाल पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे.
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने ग्रंथालय व अभ्यासिका तात्काळ सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी आग्रही भूमिका प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- मराठी सिनेसृष्टी शोकसागरात! ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन
- ‘आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्या उदयनराजेंना भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं’
- ठरलं तर मग …शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीनेही केली बिहार निवडणुक लढविण्याची घोषणा
- 25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट
- गुप्तेश्वर पांडेंचा झाला गेम : शुभचिंतकांना म्हणाले, ‘मला फोन करू नका,त्रस्त झालो आहे’


