ठाणे- गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे राहत्या घरी निधन झाले. चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये अविनाश खर्शीकर यांनी काम केले असून त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली होती.
गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. तसेच जानेवारीमध्ये देखील त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल केले होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. अविनाश खर्शीकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले यांच्यासह अनेक चित्रपटात काम केले आहे.
‘बंदिवान मी या संसारी’ हा अविनाश खर्शीकर यांचा १९७८ साली प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट, तसेच ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपली अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.
तुझं आहे तुझ्यापाशी मधला ‘ श्याम’, वासूची सासू’ अशी नाटके गाजली. त्यांचं, झोपी गेलेला जागा झाला… हे नाटक फार गाजलं. सौजन्याची ऐशीतैशी, लफडा सदन, अपराध मीच केला ही नाटके आणि आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार असे अनेक चित्रपट त्यांनी केले. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले यांच्यासह अनेक चित्रपटात त्यांनी काम केलंय.
महत्वाच्या बातम्या :-
- नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- ‘आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्या उदयनराजेंना भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं’
- ठरलं तर मग …शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीनेही केली बिहार निवडणुक लढविण्याची घोषणा
- 25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट
- गुप्तेश्वर पांडेंचा झाला गेम : शुभचिंतकांना म्हणाले, ‘मला फोन करू नका,त्रस्त झालो आहे’


