पुणे: मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्याची सुबुद्धी दे म्हणत खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाला दुग्धाभिषेक केला आहे. आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दर आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाची सुरुवात पांडुरंगाच्या दुग्धाभिषेकाने करण्यात आली.
दूध उत्पादकांना पाच रुपये वाढीव दर देण्यात यावा तसेच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे, या मागणीसाठी मुंबईची दूध कोंडी करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला होता. दरम्यान, संघटनेच्या मागणीवर सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने राज्यभरात ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या अडवण्यात आल्या असू काही ठिकाणी याला हिंसक वळण लागले आहे.
पुण्यामध्ये देखील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. यावेळी खा राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

