औरंंगाबाद : केंद्रशासनाने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. सहा महिन्यापासून शेतक-यांचे आंदोलन सुरू असून केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाची दखल घेत नसल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले.
केंद्रशासनाने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी पंजाब, हरियाणा आदी राज्यातील शेतकरी मागील सहा महिन्यापासून दिल्लीत आंदोलन करीत आहेत. शेतक-यांच्या आंदोलनाकडे ढुंकुनही न पाहणा-या केंद्र सरकारचा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्र्यांनी निषेध केला.
स्वाभीमानी शेतकरी संघटना युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी काळ्या फिती बांधुन केंद्र सरकारचा निषेध करणा-या घोषणा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

