Share

हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

चाकूर : पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

तालुक्यातील शेतकरी दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. यातच जून महिन्यात पाऊस झाला नसल्यामुळे काही भागांत पेरण्या झाल्या नाहीत. ज्या भागात पेरणी होऊन सोयाबीन काढण्याची वेळ आली होती, तेथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, तूर, टोमॅटो, भाजीपाला व फळबागेला पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

प्रशासनाकडून मात्र पंचनामे करून वेळकाढूपणा केला जात आहे. तसेच पीकविम्याची रक्कम बॅंकेत भरली असून त्याच्या नोंदी विमा कंपनीकडे असतानाही नुकसान झाल्याबाबत अर्ज मागवून घेतले जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांना तास – तास रांगेत थांबावे लागत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांना अर्ज भरावे लागत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, पीकविम्यासाठीच्या जाचक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी.

आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर सर्व मालाची खरेदी सुरू करावी, रब्बीसाठी बियाणे व खत मोफत देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावर तालुकाध्यक्ष गोविंद बस्तापुरे, संतोष भेटे, रमाकांत मोरे, मारोती देवकत्ते, नागनाथ होनराव, ज्ञानोबा हेळंबे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192344471305744384?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192343981167767552?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!