🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकणे महागात पडले आहे. स्वभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडेसह वाळवा तालुका अध्यक्ष भगवान जाधव यांना दोन वर्षांसाठी सांगली जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी इस्लामपूर – सांगली रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या होत्या. कडकनाथ कोंबड्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत स्वभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी हे पाउल उचलले होते त्यामुळे त्यांच्यावर तडीपार ची कारवाई करण्यात आली आहे.
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचं आमिष ‘महारयत अग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने दिले होते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली होती. यानंतर संचालक मंडळवर गुन्हाही दाखल झाला आहे. ही कंपनी सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे स्वभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच या निर्णयामुळे राजू शेततळी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181799983156092928?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181787238004191232?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
