Share

सुवर्णा मुजुमदार यांचा मृत्यू म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेला बळी

Published On: 

पुणे: मांजाने गळा कापला गेल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पुण्यातील महिलेचा अखेर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ‘सकाळ’ वृत्तपत्रातील जाहिरात आणि मार्केटिंग विभागातील कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचं रविवारी सकाळी खाजगी रुग्णालयात निधन झालं. सर्वोच्च न्यायालयाने नायलॉन मांजा उत्पादन आणि विक्रीवर निर्बंध घातले असताना पतंग उडविण्यासाठी चिनी मांजा सर्रासपणे वापरला जातोय त्यामुळे सुवर्णा मुजुमदार यांचा मृत्यू म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेला बळी नव्हे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. .

सुवर्णा बुधवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या शिवाजी पुलावरुन दुचाकीवरुन घरी जात होत्या. यावेळी त्यांच्या गळ्याभोवती चिनी मांजा गुंडाळला जाऊन त्यांचा गळा कापला गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पतंगासाठी वापरण्यास बंदी असलेल्या चिनी मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने घातक असलेल्या ‘नायलॉन’च्या चिनी मांजावर बंदी घातली आहे. या मांजाचा वापर करू नये, असे आवाहनही प्रशासन व पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. तरीही हा मांजा शहरातील दुकानांमध्ये सर्रासपणे विकला जातो. पतंग उडवताना काही हौशी तरुणांकडून नायलॉनचा चिनी मांजा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या नायलॉनच्या मांजामुळे लहान मुलांसह दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या मांजाने लहान मुले आणि दुचाकीस्वारांचे हात आणि गळा चिरल्याच्या घटना घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नायलॉन मांजा उत्पादन आणि विक्रीवर निर्बंध घातले आहेत. शहर पोलीस या पतंग विक्रेत्यांवर कठोर कारवाई कधी करणार, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. हा चिनी मांजा पक्ष्यांसोबतच हा मांजा आता दुचाकीस्वारांच्या जीवावर उठला असून यामुळे लहान मुले देखील जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. सुवर्णा यांच्या बळीनंतर तरी प्रशासनाला जाग येतेय का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार असून भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून कोणती उपाय योजना पोलिसांकडून केली जातेय यावर देखील लक्ष असणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!