🕒 1 min read
मुंबई – परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर राज्यभर गाजलेल्या १०० कोटी वसुली प्रकरणात आरोप झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सोशल मिडीयावर देखील या मुद्द्यावरून परब यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. मात्र सोशल मिडीयावर ठाकरे सरकारविरोधात बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे एका एसटी कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे.
आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका एसटी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळ आगारातील प्रविण ज्ञानेश्वर लढी यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अनिल परब आणि ठाकरे सरकारविरोधात ज्ञानेश्वर लढी यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यामध्ये लढी यांनी म्हटले होते की, “महावसुली खंडणीखोर चोरटोळी अंबानीच्या घराशेजारी स्फोटके ठेवायला ड्रायव्हर मिळाला. ऑक्सीजन टँकरसाठी ड्रायव्हर मिळत नाही. १०० कोटी वसुली सरकार.” असा मजकूर सोशल मिडीयावर त्यांनी प्रसारित केला होता.
यानंतर एस. एस राठोड यांनी दिलेल्या अहवालानंतर लढी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २० जुलै रोजी लढी यांचे एसटीमधून निलंबन करण्यात आले. मात्र, त्यांना नियमांप्रमाणे निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. निलंबन कालावधीत लढी यांनी यवतमाळ आगारामध्ये दररोज हजेरी लावावी, असेही आदेशात म्हटले आहे.
यवतमाळ आगारात कार्यरत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याने लिहिलेला 'वसूली सरकार' हा मजकूर बदनामीकारक आहे म्हणून त्याचे निलंबन करण्यात आले आहे की खरं, वास्तव सांगितल्याबद्दल त्याला निलंबनाची शिक्षा देण्यात आली आहे हे सरकारने स्पष्ट करावे. pic.twitter.com/NRXHsaxp9N
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 29, 2021
दरम्यान, आता याच मुद्द्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यवतमाळ आगारात कार्यरत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याने लिहिलेला ‘वसूली सरकार’ हा मजकूर बदनामीकारक आहे म्हणून त्याचे निलंबन करण्यात आले आहे की खरं, वास्तव सांगितल्याबद्दल त्याला निलंबनाची शिक्षा देण्यात आली आहे हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पवना धरण ८५ टक्के भरले; विसर्ग सुरु होणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
- शिखर धवनने दुसर्या टी -20 सामन्यात कोहलीचा विक्रम मोडत घेतली अव्वल स्थानी झेप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
