Share

निलंबनामुळे परिणाम नाही, अधिक ताकदीने कामे करू: आमदार अभिमन्यू पवार

Published On: 

लातूर : राज्य विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात भाजपच्या ११ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या निलंबनामुळे हे अधिवेशन देखील चांगलेच वादळी ठरले. मात्र, या निलंबनाचा विकास कामांवर परिणाम होणार नाही. तर आपण अधिक ताकदीने कामे मार्गी लावणार असल्याचा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केलाय.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार म्हणून अभिमन्यू पवार यांची ओळख आहे. किंबहूना देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पवार राजकारणात आले आहेत. दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलेल्या आमदारांमध्ये अभिमन्यू पवार यांचाही समावेश आहे. या निलंबनामागे महाविकास आघाडीची वेगळी चाल असल्याचा आरोप पवार यांनी याआधीही केला होता. या संदर्भात बोलताना त्यांनी आपण अधिक ताकदीने कामे मार्गी लावणार असल्याचे म्हटले आहे.

अभिमन्यू पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘२ दिवसीय अधिवेशनात ओबीसी आरक्षणाचा विषय आक्रमकपणे मांडल्याबद्दल कासार सिरसी मंडळातील ओबीसी समाजबांधवांनी ठिकठिकाणी सत्कार करून अभिनंदन केले. निलंबनामुळे विकासकामांवर किंचितही परिणाम होणार नसून उलट अधिक ताकदीने कामे मार्गी लावीन असा विश्वास उपस्थितांना दिला.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!