Share

Gujrat | धक्कादायक! गुजरातमध्ये पूल कोसळला, १२० जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता

Published On: 

🕒 1 min read

Gujrat | गांधीनगर : गुजरात (Gujrat) येथील राजकोटमधील मोरबी (Morbi) भागात पूल कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेट (Gujrat Accident) तब्बल १२० जणांच्या मृत्यूचा आकडा समोर आला आहे. तर अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. एवढंच नाही तर मृत्यूंचा अकडा वाढण्याची देखील शक्यता आहे.

हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत आहे. नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुलावर उभे असलेले शेकडो लोक मच्छू नदीत पडले. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी दुर्घटनेत आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला

आहे. यात महिला, लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश आहे. या अपघातात 177 जणांना वाचवण्यात यश आलं असून 19 जखमींवर मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गुजरात निवडणुकीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील आपला रोड शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!