IND vs SA । नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी ३० ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकातील ३० वा सामना सुरु आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ बलाढ्य आफ्रिकन संघाला हरवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १३३ धावांचे आव्हान दिले आहे. या टार्गेटचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवला
या सामन्यात खेळताना लुंगी एनगिडीने कहर केला आहे. त्याने सुरवातीला एकापाठोपाठ एक दोन मोठे धक्के देत भारताला अडचणीत आणले, रोहित शर्मा पाठोपाठ राहुललाही बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर आता भारतीय टीमला विराट कोहलीकडून मोठी अपेक्षा होती. मात्र एनगिडी विराट कोहली झेलबाद केले. कोहलीची विकेट हि भारतासाठी सर्वात मोठा धक्का मनाला जात आहे.
एनरिक नॉर्सियाने भारतीय संघाला चौथा धक्का दिला आहे. त्याच्या चेंडूवर दीपक हुडाने खाते न उघडता विकेटच्या मागे क्विंटन डी कॉककडे झेलबाद केले. यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र त्यालाही या सामन्यात लुंगी एनगिडीने कागिसो रबाडाकडे झेलबाद केले. यानंतर भारतीय संघाचे ४ महत्वाचे फलंदाज एनगिडीने बाद केले. यावेळी भारताची धावसंख्या 101/5 अशी होती.
पुढे भारतीय संघाला सहावा धक्का दिनेश कार्तिकच्या रूपाने बसला आहे. कार्तिकने वेन पेर्नेलच्या चेंडूवर 6 धावा केल्या आणि रिले रॉसोने त्याचा झेल घेतला. कॅगिसो रबाडाने रविचंद्रन अश्विनची विकेट घेत भारताला 7वा धक्का दिला. तर पुढे चांगल्या फॉममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवची केशव महाराज याने विकेट घेतली. यादवने 40 चेंडूत 68 धावा केल्या. यानंतर मोहम्मद शमीच्या रूपाने भारताला 9वा धक्का बसला. शमी धावबाद झाला. यावेळी भारताच्या संपूर्ण संघाला १३३ धावा करता आल्या.
क्विंटन डी कॉकच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला. डेकॉकने 3 चेंडूत 1 धाव केली. यावेळी अर्शदीप सिंगच्या चेंडूवर रोहित शर्माकडे झेलबाद झाला. यानंतर लगेच अर्शदीप सिंगच्या दुसऱ्याच चेंडूवर रोसो खाते न उघडता एलबीडब्ल्यू आऊट झाला. यानंतर एडन मार्कराम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. पुढे दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का टेम्बा बावुमाच्या रूपाने बसला. बावुमा 10 धावा करून मोहम्मद शमीच्या चेंडूवर दिनेश कार्तिककडे झेलबाद झाला.
मात्र यानंतर आता डेव्हिड मिलर फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. पर्थच्या अवघड खेळपट्टीवर एडेन मार्करम शानदार फलंदाजी केली. मार्करामने 28 चेंडूत 30 धावा करत संघाची धुरा सांभाळली आहे. दुसऱ्या टोकाला डेव्हिड मिलरने त्याला साथ दिली. डेन मार्करामने ३८ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शानदार अर्धशतक ठोकले. त्याचे टी-२० कारकिर्दीतील हे ९वे अर्धशतक आहे. मिलर आणि मार्करामने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला.
एडन मार्करामच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का बसला आहे. एडेन मार्करमने 52 धावा केल्या आणि तो हार्दिक पांड्याच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवकडे झेलबाद झाला. यानंतर ट्रिस्टन स्टब्स फलंदाजीसाठी मैदानात उतरला. या सामन्यात मिलरने ४० चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. शेवटी अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 19.4 षटकांत 5 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. डेव्हिड मिलरने नाबाद 59 तर एडन मार्करामने 52 धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Bachhu Kadu । नाव बच्चू असंल तरी आडनाव कडू आहे हे लक्षात घ्या; बच्चू कडूंचा इशारा
- T-20 World Cup । टी 20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नावावर आणखीन एक मोठं रेकॉर्ड
- IND vs SA । सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर १३३ धावांचे आव्हान
- Nail Care Tips | नखांवरील चमक वाढवायची असेल तर ‘या’ खाद्यपदार्थांचा आपल्या आहारात करा समावेश
- Kirit Somaiya | पुढाच्यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार किशोरी पेडणेकरांना मिळू शकतो – किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा


