🕒 1 min read
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आजही त्याचे चाहते विसरले नाहीत. सुशांत गेल्यानंतर त्याचे वडील केके सिंह (K. K Singh) यांनी मुलाला न्याय मिळावा म्हणून बरेच प्रयत्न सुरू केले होते. पण त्यांचीच तब्येत सध्या बिघडली आहे. सूत्रांकडे मिळालेल्या माहितीनुसार त्यांना हृदयाशी संबंधित आजाराचा सामना करावा लागत आहे. केके सिंह सध्या रुग्णालयात भरती झाले आहेत.
सुशांतच्या वडिलांना आता केके सिंह यांना हरयाणाच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातला त्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. सुशांतच्या वडिलांची तबियत लवकर बरी व्हावी म्हूणन सुशांतचे चाहते त्यांच्यासाठी प्राथर्ना करत आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जुलै रोजी मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. ही घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. ‘दिल बेचारा’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.
महत्वाच्या बातम्या
- भाजपमधील काही आमदार राष्ट्रवादीत जाणार? मलिक-भुजबळ म्हणाले…
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- पंतप्रधान मोदींनी गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट; कॉंग्रेसला मिरच्या झोंबल्या
- साध्वी प्रज्ञा सिंह यांची तब्येत बिघडली; एम्समध्ये दाखल
- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक डोळ्यासमोर ठेवूनच जगतापांवर सोपविली पक्षाने मोठी जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
