Share

सुर्यकुमार यादवची टी20 संघात निवड, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण ; हरभजन-इरफान म्हणतात…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या चार वर्षांपासून भारतीय संघाचं दार ठोठावनारा सुर्यकुमार यादवसाठी अखेर भारतीय संघाचे दरवाजे उघडले आहेत. मुंबई इंडियन्सचा धमाकेदार फलंदाज सूर्यकुमार यादव याने आयपीएलच्या 13 व्या मोसमात धडाकेबाज कामगिरी केली होती. गेल्या तीन-चार वर्षांपासून सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करतोय. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सूर्यकुमारची भारतीय संघात नक्कीच निवड होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सूर्यकुमारची एकदिवसीय, टी 20 किंवा कसोटी या तीनपैकी कोणत्याही मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नव्हती.

मुंबईकर सूर्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी दिलेली आहे. बीसीसीआयची निवड समिती टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला संधी देली गेली आहे. बीसीसीआयला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तगडा संघ उभा करायचा आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणारे तसेच आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंना संधी दिली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादव याला देखीलया मालिकेत संधी दिलेली आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळालेली.

यावर त्याचे फॅन्स खूप आनंदित आहेत. तसेच, हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनीही सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या टीम इंडियामधील निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हरभजन सिंगने ट्वीट केले की, “अखेल सूर्यकुमार यादवला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं. खुप शुभेच्छा” इरफान पठाणने  देखील ट्वीट केले की, अखेर प्रतीक्षा संपली सूर्यकुमार यादव. अभिनंदन मित्र. खुप शुभेच्छा. ईशान किशन आणि राहुल तेवतिया यांना पदार्पणासाठी शुभेच्छा.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!