पुणे: पुणे- मुंबईसह महाराष्ट्र राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा येत्या काहीच दिवसात राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार आहेत. गेल्या २ वर्षात पुणे शहरात आधी ११ आणि नंतर २४ गावांचा समावेश झाल्याने पुणे महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका झाली आहे. पुणे शहर आता महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य झाले आहे. पुण्यात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती, मात्र २०१७ मध्ये झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवणुकीत भारतीय जनता पक्षाने ९९ नगरसेवक निवडून आणले आणि पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेची सत्ता मिळवली. २०२२ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काहीच दिवसापूर्वी प्रारूप प्रभाग रचनेची यादी राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आली.
ही नवीन प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल असली तरी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष पण आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता जोरदार तयारीला लागली आहे. पुणे भारतीय जनता पक्षाने नुकतेच पुणे काँग्रेस पक्षातील अरविंद शिंदे यांच्या जवळच्या नातेवाईकाला भारतीय जनता पक्षात घेऊन पुणे शहर काँग्रेसला खिंडार पाडले आहे. प्रणय शिंदे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे , भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहोत अशी प्रतिक्रिया आज प्रणय शिंदे यांनी दिली.
पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी प्रणय शिंदे यांची भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस पक्षाचे पुणे महानगरपालिकेतील सभागृह नेते अरविंद शिंदे यांचा पुतण्याचं भारतीय जनता पक्षात गेल्याने पुणे शहर काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शाहरुख थुंकला नाही तर त्याने दुआ मागून…
- नातं जिव्हाळ्याचं! सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या हाताने घातले शरद पवारांच्या पायात बूट
- किरीट सोमय्यांनी उगाच राजकीय नौटंकी करू नये- अनिल परब
- गडकिल्ले फिरत असताना अजून एका ट्रेकरचा मृत्यू..
- IND vs WI: १००० वा ऐतिहासिक सामना जिंकण्यासोबतच रोहितने तोडला विराटचा रेकॉर्ड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

