उस्मानाबाद: उमरगा तालुक्यात कोरोनाने दुसऱ्या लाटेमुळे अनेक जणांचे प्राण गेले आहे, तरी सध्या रुग्ण संख्या कमी होत असली तरी तीसरी लाट नाकरता येत नाही. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नियोजन संदर्भात तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली बालरोगतज्ज्ञ डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली, यामध्ये लहान मुलांचा सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून अद्याप मुक्तता मिळाली नसताना संभाव्य तिसऱ्या लाटेत दहा वर्षांखालील बालकांमध्ये कोरोना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे त्यावर नियोजन व पूर्वतयारी संदर्भात आ. चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व बालरोग तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत बालकांना कोरोना झालेला आहे का, त्यांना प्राथमिक लक्षणे दिसून येत नाहीत किंवा सुरुवातीच्या काळात काहीच त्रास होत नाही. पाच ते सहा आठवड्यांच्या दरम्यान अनेक बालकांना पोस्ट कोवीडची लक्षणे आढळून हृदय, किडनी, फुफ्फुस आदी अवयवांवर सूज येत असल्याची माहिती उपस्थित बालरोग तज्ज्ञांनी दिली. यासाठी अशा बालकांवर व ज्यांच्या घरात कोविड रुग्ण होऊन गेलेले आहेत, अशा घरातील बालकांवर सर्वाधिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अशा बालकांचा सर्व्हे करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.
शिवाय कोरोनाबाधित बालकांना लागणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करणे, बालकांसाठी स्वतंत्र्य कोवीड सेंटर तयार करणे, कोविड उपजिल्हा रुग्णालयात बालकांसाठी बेड राखीव ठेवणे, गेल्या दोन महिन्यात शहर व ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने सर्व गावातील विशेषतः बाधित कुटुंबातील बालकांच्या नोंदी घेण्यासोबत अत्यावश्यक विषयांवर बैठकीत चर्चा झाली. आई-वडिलांनी त्यांच्या मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा झाला असल्यास कशी काळजी घ्यावी, याबाबत बालरोग तज्ज्ञ व आशा कार्यकर्ती यांच्यात समन्वय ठेवणे व याबाबतची माहिती सोशल मीडिया अन् माहितीपत्रकाद्वारे गावोगावी पोहचवणे याबाबतचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीस उपस्थित बालरोग तज्ज्ञांच्या सूचनेनुसार शासन दरबारी आवश्यक बाबींची उपलब्धता होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार चौगुले यांनी या वेळी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे यांच्यामुळेच मी राजकारणात आले!’, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट
- ‘औसा येथील शेतकऱ्यांनी केशर आंब्याची लागवड करावी’- आ. पवार
- ‘सोशल मीडियावर आज अंकुश लावण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे’
- ‘ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात, महाविकास आघाडी सरकारचा ओबीसींवर पुन्हा अन्याय’
- ठाकरे सरकारला धक्का! ओबीसी आरक्षण प्रश्नी पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

