Share

८ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ करणाऱ्या न्यासा कंपनीचे नाव काळ्या यादीत नाही हे आश्चर्यच- भाजपाची टीका

Published On: 

मुंबई : राज्यात २५ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाच्या गट क आणि ड पदासाठी परीक्षा होणार होत्या. या साठी राज्यातील ८ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र कोणतेही कारण न देता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले होते. आता नविन तारखा जाहीर केल्या आहेत. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ८ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या न्यासा कंपनीकडून आरोग्य विभागाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या कंपनीचे काळ्या यादीत नाव नाही हे आश्चर्यच अशी टीका भाजपा नेते भातखळकर यांनी केली आहे.

आरोग्य विभागात गट क संवर्गाच्या २,७३९ पदावाठी व गट ड साठी ३,४६६ पदांसाठी या परीक्षा होत आहेत. आता या परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी गट क साठी तर ३१ ऑक्टोबर रोजी गट ड साठी परीक्षा होणार आहेत. सोमवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

भातखळकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते ट्विटवर म्हणतात, ‘८ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या न्यासा कंपनीकडून आरोग्य खात्याच्या परीक्षा पुन्हा २४ व ३१ ऑक्टोबरला घेतल्या जाणार आहेत. आश्चर्य आहे की अजूनही शासनाच्या काळ्या यादीत न्यासा कंपनीचे नाव नाही. सरकारमध्ये वरपर्यंत मजबूत सेटिंग दिसते आहे.’ अशी टीका भातखळकरांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!