Share

मुख्यमंत्री केंद्रातल्या नेत्यांच्या भाषणाची मराठीत कॉपी करतात – सुप्रिया सुळे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस हे सगळ्यात पुढे आहेत. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या या सभांतील भाषणांवरून राष्ट्रवादीचे नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार निशाना शाधला आहे.

केंद्रातील भाजपचे नेते हिंदीत जी भाषणं करतात; तीच भाषणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठीतून करीत आहेत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. ‘एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा टोला लगावला आहे.

सध्या महाराष्ट्राची निवडणूक सुरू आहे. फडणवीस सरकारने पाच वर्षांत काय केले हे त्यांनी सांगायला हवं. पण ते भारत पाकिस्तान, ३७० कलम यांसारख्या भावनिक मुद्द्‌यावरच भाषणं करत आहेत. अस देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. रस्ते खड्‌डेमुक्‍त झालेले नाहीत. उद्‌योग बंद पडत आहेत. अनेक भागात दुष्काळाचे तर काही भागात महापुराचे संकट आहे. जनता त्रस्त असताना सरकारने त्यावर केलेल्या उपाययोजना सांगायला हव्यात. पण, ते या सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करताना अपयशी झाले असल्याने त्यांना अशाप्रकारच्या विषयांचा आधार घ्यावा लागतो आहे, असे सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182179212314079232?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182178982990471168?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182173101208920065?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!