Share

माझा विरोधक हा पालापाचोळा नव्हे तर कचरा उमेदवार, भाजपच्या मंत्र्याची जीभ घसरली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. या प्रचारदरम्यान अनेक नेते एकमेकांवर सडकून टीका करताना पहायला मिळत आहेत. अशाच एका सभेत भाजपचे मिरजचे उमेदवार आणि सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांची विरोधकांवर बोलताना जीभ घसरली आहे.

सुरेश खाडे हे एका सभेत बोलत असताना ‘मी यापूर्वी सांगितलं होतं माझ्या विरोधात पालापाचोळा असणारे उमेदवार देऊ नका मात्र आता माझ्या विरोधात पालापाचोळा नव्हे तर कचरा उमेदवार दिला आहे’ असं विधान केले आहे. त्यामुळे सत्तेसाठी राजकारणाची पातळी घसरत असल्याचं दिसत आहेत. खाडे यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब होनमोरे निवडणूक लढवत आहेत.

सुरेश खाडे यांच्या विधानावर विरोधकांनीही टीका केली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना सत्तेचा माज आला आहे. म्हणूनच खाडे विरोधी उमेदवाराविषयी चुकीचे वक्तव्य करत आहेत. लोकशाहीमध्ये अहंकार फार दिवस चालत नाही, अहंकार एक दिवस रसातळाला घेऊन जात असतो असं म्हटले आहे.

दरम्यान स्वाभिमानीचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांनी आमदार सुरेश खाडे हे विरोधी उमेदवारांना पालापाचोळा म्हणताहेत. मात्र या निवडणुकीत याच पालापाचोळ्यात खाडे जळून खाक होतील असं विधान केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181422512657158144?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181421842751377409?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181417232460439552?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!