Share

‘इतिहास घडणार, बारामतीमधून सुप्रिया सुळे पडणार’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयासाठी इंदापूर आणि भोरमध्ये अदृश्य शक्ती काम करत आहेत, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पाटील बोलत होते. या निवडणुकीत इतिहास घडणार असून बारामतीमधून सुप्रिया सुळे पडणार असा विश्वास यावेळी महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

यावेळी मेळाव्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या विजयाची गुढी उभारण्याचा निर्धार केला, उपस्थितांनी केला. पाटील म्हणाले की, पुरंदर, खडकवासला आणि दौंडमध्ये भाजपला चांगले समर्थन मिळत आहे. तर इंदापूर आणि भोरमध्ये अदृश्य शक्ती भाजपसाठी काम करत आहेत. त्यामुळे या वेळी इतिहास घडणार आहे आणि मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली कांचन कुल निवडून येतील यात शंका नाही.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, बारामतीमध्ये अजून काम करावे लागणार आहे. त्यामुळे मी स्वतः शेवटचे ३ दिवस बारामतीमध्ये तळ ठोकणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. दरम्यान, पाटील यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या इंदापूर आणि भोरमध्ये नेमक्या कुठल्या शक्तींना भाजपने आपल्याकडे वळवले आहे, यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी बोलताना महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी आपली आगामी रणनीती स्पष्ट केली. चांगला दिवस पाहून पाच हजार कार्येकर्ते घेऊन बारामती मतदार संघात प्रचारात उतरणार. बारामती मतदार संघातील निवडणुक ही सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल मध्ये नसून ही निवडणूक देश तोडणारे आणि देश जोडणारे यांच्यामध्ये आहे असं म्हणत आघाडीवर तोफ डागली.

‘ शिवतारे म्हणाले, ‘या निवडणुकीत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गल्लीतील कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. यावरून मुलीच्या पराभवाचा धसका पवार यांनी घेतल्याचे दिसत आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसची भ्रष्टाचाराची कीड कायमची नष्ट करण्याची संधी आली आहे आणि ती संपविल्याशिवाय गप्प राहणार नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!