पुणे : पुरंदर तालुक्यातील खनवडी हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव आहे. या गावात मुलींसाठी आदर्श शाळा उभारण्यात येणार आहे. याची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केली आहे. सुप्रिया सुळे यांनी या गावात शाळेची नुकतीच पाहणी केली आहे. तसे ट्विट त्यांनी केले आहे.
या शाळेसाठी तीन एकर गायरान जमीन संपादीत केली जाणार असून मुलींच्या निवासाचीही व्यवस्था केली जाणार आहे. तसेच शाळा पूर्ण झाल्यावर ती केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालयांसारख्या नामांकित संस्थेकडे चालविण्यास देण्याबाबत चाचपणी सुरु असल्याचे सुळे म्हणाल्या. यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेत यावर चर्चा झाली असून सर्व आराखडा तयार करण्यात आला आहे.
https://twitter.com/supriya_sule/status/1445661144882900992
खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील खानवडी गावाला भेट दिली आहे. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव असलेल्या नायगाव येथे त्यांच्या घराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून हे विकासकाम झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडे वाड्यालाही त्यांनी भेट दिली.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- उत्तर प्रदेशात झालेल्या निर्घृण हत्या सहन केल्या जाणार नाहीत- मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी
- ‘स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’त शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या, याला ‘रक्त महोत्सव’ म्हणायचं का?’
- …म्हणून बारामतीला यायला प्रत्येकाला आवडतं; सुप्रिया सुळेंचा सोमय्यांना टोला
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप


