🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांच्या गैरहजेरीत एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत विराजमान झाल्याचे दिसत आहेत. यावरुन रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो ट्विट करत टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देताना शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्विट करत त्यांच्यावर देखील आरोप केले आहेत.
शीतल म्हात्रे यांनी शेअर केला सुप्रिया सुळे यांचा फोटोः
शीतल म्हात्रे यांनी शेअर केलेल्या फोटो मध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेल्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे बसल्याचं दिसत आहेत.
पाहा ट्विटः
हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ?? pic.twitter.com/8UUb5VzMQR
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) September 23, 2022
ट्विट केलेल्या फोटोला शीतल यांनी हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ??, असा सवाल केला आहे. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस काय उत्तर देणार हे पाहणं आता म्हत्वाचं ठरेल.
श्रीकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आरोपः
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांचे खुर्चीत बसले असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. यावरुन अनेकजण राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. हे छायाचित्र वर्षा बंगल्यावरच टिपण्यात आलेले आहे किंवा नाही, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र, फोटो व्हायरल होताच विरोधकांनी शिंदेंना धारेवर धरलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Electric Car Update | ‘ही’ सोलर इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये गाठते 1,600 किमी अंतर
- MNS vs Shivsena | दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर मनसेचे उद्धव ठाकरेंना मोठे आव्हान!
- Atul Bhatkhalkar | गृहमंत्रीपदाबाबत अजित पवारांच्या विधानावर भातखळकरांचा खोचक टोला म्हणाले…
- Wildlife Rescue | पिंपरी चिंचवड मध्ये गव्हाणी घुबडांना दिले जीवनदान
- chandrakant khaire | “गद्दारांच्या छाताडावर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
