Share

MNS vs Shivsena | दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर मनसेचे उद्धव ठाकरेंना मोठे आव्हान!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिंदे गटाला न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने शिंदे गटाला मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली नाही. मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच्या निषेधार्थ शिंदे गटाने न्यायालयात याचिका दाखल करून ठाकरे गटाच्या याचिकेवर न्यायालयाने कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली. मात्र, शुक्रवारी न्यायालयाने शिंदे गटाचा अर्ज फेटाळून लावला. दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी शिंदे गटाच्या वतीने हा अर्ज दिला होता. आता शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

“उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील माणूस मुंबईबाहेर का गेला? त्याबाबत बोलावं. तसेच भोंगे आणि अनधिकृत मदरशांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी”, असे आव्हान संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, “तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाबद्दल बोलणार आहात का?, तुम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल बोलणार आहात का?. माझ उद्धव ठाकरेंना आव्हान आहे. तुमची अनधिकृत मशिदीवरील भोंग्यांबाबत काय भूमिका आहे. तुमची मराठी माणसाबद्दल काय भूमिका आहे. का तो मुंबई सोडून बाहेर जात आहे. या सगळ्यांवर जर तुम्ही बोलला तर खरं शिवाजी पार्क मैदान मिळालेल्यांना अर्थ राहील.”

शिंदे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार?-

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेऊ शकतात, अशी बातमी आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महापालिकेला ‘सत्तेचा गैरवापर’ केल्याबद्दल फटकारले. गेल्या ५ दशकांहून अधिक काळ शिवसेना शिवाजी पार्कवर मेळावा आयोजित करत आहे.

हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. माहीमचे आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने ठाकरे कॅम्पच्या याचिकेविरोधात उच्च न्यायालयातही अर्ज करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने शिंदे गटाच्या आमदाराचा अर्ज फेटाळून लावला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!