Share

केंद्र सरकार राज्याचे अधिकार काढून देशात हळूहळू आणीबाणी आणत आहे – सुप्रिया सुळे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मेट्रो कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा जोरदार संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य सरकारनं आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केली. मात्र आता केंद्रानं कांजूरमार्गमधील जागेवर दावा सांगितला आहे. तसं पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवलं आहे.

कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही. यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणे चुकीचे आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा. कारशेड उभारणीवरुन केंद्र सरकारचे मोठे नुकसान होणार आहे असे केंद्राने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

याबाबत तातडीने हस्तक्षेप करीत ‘एमएमआरडीए’ने सुरू केलेले कारशेड उभारणीचे काम थांबवावे. ही जागा ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरीत करण्याचा आदेश रद्द करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगावे, असे केंद्राने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आता यावरून जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली आहे. मिठागराची ती जागा राज्य सरकारचीच आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर पहिला अधिकार हा त्या राज्याचाच असतो, असं सांगतानाच केंद्र सरकार सातत्याने राज्याचे अधिकार काढून देशात हळूहळू आणीबाणी आणत आहे, असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

केंद्र सरकारने मिठागराच्या जागेवर दावा केला आहे. ही त्यांचीच जमीन असल्याची धक्कादायक गोष्ट त्यांच्याकडूनच कळली. खरं तर ती जमीन महाराष्ट्राचीच आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर त्या राज्याचा पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करत आहे. त्यांच्या कृतीतूनच हे दिसत असून ही दुर्देवी घटना आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कांजूरमार्गमधील मिठागराची जमीन महाराष्ट्राची आहे. विकासकामासाठी तिचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजप कोणत्या आधारावर टीका करत आहे, असा सवाल करतानाच केंद्र सरकार या देशात हळूहळू आणीबीणी आणू पाहत आहे. सध्या तरी तसंच चित्रं दिसतंय, असंही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!