Share

‘हे तर मुघलांचे राज्य, स्त्रियांचा सन्मान यांना जमत नाही’, सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सूनेला सीबीआयने अटक वॉरंट जारी केले आहे. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ‘हे मुघलांचे राज्य आहे. महिलांचा मानसन्मान करणे ही यांची संस्कृती नाही’ असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

शंभर कोटी वसुली प्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख यांच्या घरी आज सोमवारी सीबीआयने धाड टाकली आहे. सकाळी आठ वाजताच सीबीआयचे सात अधिकारी घरी पोहोचले असून देशमुखांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे देशमुखांचे सुपुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचा वॉरन्ट आहे. त्यामुळे देशमुखांच्या मुलाला आणि सूनेला अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकार हे मुघलांचं आहे. छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात टाकला नाही. छत्रपतींनी नेहमी महिलांचा मानसन्मानच केला आहे. या मुघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास आपण पाहिला आहे. अर्थात हे मुघलांचं राज्य चाललं आहे. महिलांचा मानसन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नाही. या देशातील महिला अबला आहे असं त्यांना वाटतं. याच महाराष्टातील मुली मग ती सावित्री असू दे अहिल्या देवी किंवा राणी लक्ष्मीबाई. यांचं कर्तृत्व हे सरकार विसरलं आहे. म्हणून सर्वच महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण महाराष्ट्राच्या लेकी या अत्याचाराच्या पुढे खंबीरपणे उभ्या राहतील आणि यशस्वी होती. कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!