🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री पदाच्या वादातून चर्चा फिसकटल्याने शिवसेनेने भाजपशी केलेली युती तोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाबरोबर वेगळा संसार मांडण्याचा घाट घातला आहे. त्या दृष्टीने शिवसेनेने निर्णायाक पाऊल देखील उचलली आहेत. मात्र या महाशिव आघाडी विरोधात हिंदू महासंघाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ही आघाडी नैतिकेतेला धरून नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
हिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांनी ही याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रात भाजप व शिवसेना या पक्षांची निवडणूकपूर्व युती होती. हिंदुत्वाच्या मुद्यांवर या दोन्ही पक्षांनी मतदारांकडे मते मागितली. या युतीला पूर्ण बहुमत मिळाल्याने त्यांनीच सत्ता स्थापन करणे आवश्यक असताना शिवसेनेने केवळ सत्ता मिळवण्यासाठी दुसऱ्या पक्षांसोबत जाण्याचा विचार सुरू केला आहे. हा प्रकार म्हणजे मतदारांशी द्रोह असल्याचा दावा प्रमोद जोशी यांनी केला आहे.
दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर भाजप – शिवसेनेमध्ये सत्ता वाटपावरून खटके उडले. भाजप पक्ष देलेले शब्द पाळत नसल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. लोकसभा निवडणुकी वेळीचं अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद हवे असल्याची मागणी केली होती. ही मागणी त्यावेळी भाजप अध्यक्षांनी स्वीकारली देखील होती. मात्र निकालानंतर आम्ही ही मागणी मान्यचं केली नव्हती, असा दावा भाजपने केला. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसशी संपर्क साधत महाशिवआघाडीचा डाव मांडला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1194931742097862656?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1194931626305712128?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1194929660796104704?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
