🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भाषावार प्रांतरचनेनुसार सर्व भाषिकांना त्यांच्या त्यांच्या भाषेची राज्य मिळाली पण महाराष्ट्रावर सुरवातीपासूनच अन्याय झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जिथून सुरू झाली ते म्हणजे बेळगाव. पण 1956 पासून बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकी सह 865 गावांचा प्रदेश अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. त्यासाठी कित्येकजण हुतात्मे झाले, अनेक आंदोलने झाली, अनेकांनि तुरुंगवास भोगला पण सीमाप्रश्न जशास तसाच आहे. म्हणून 2004 साली महाराष्ट्र शासनाने हा प्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी सीमाप्रश्न सोडवणूक आपल्या जाहीरनाम्यात घ्या अशी मागणी केली आहे. सर्व राजकीय पक्षांना आणि महाराष्ट्रातील नेत्यांना पत्रं लिहून केली मागणी केली आहे.
दरम्यान, आता वेळ आहे आली आहे शेवटचा भीमटोला देण्याची. आणि म्हणून खटला वेगाने चालावा व 1956 पासून प्रलंबित सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी आपल्या पक्षाने आणि आपण स्वतः सुद्धा सर्वोतोपरी प्रयत्न करावेत आणि यासाठी सीमाप्रश्न सोडवणूक हा विषय आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमांकर घ्यावा आणि आपण यासाठी सिमावासीयांची बाजू मांडत पाठपुरावा करावा ही समस्त सीमाभागातील मराठी जनतेची कळकळीची मागणी आहे. ही मागणी आपण आपल्या जाहीरनाम्यात सामील करून सीमाभागातील जनतेला आपण न्याय द्याल ही अपेक्षा आहे. अशी मागणी समितीने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178619577812447233?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178619392134766592?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178616083957157889?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
