🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भाजपने पुणे शहरातील उमेदवार घोषित केले आहेत. भाजपच्या संसदीय कमिटीच्या बैठकीत रविवारी रात्री हा निर्णय झाला आहे. बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करतानाच भाजप उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. यामध्भाये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील पुण्यातून लढणार आहेत.
भाजपने पुणे कॅन्टोमेंट मतदारसंघात माजी मंत्री दिलीप कांबळे यांना उमेदवारी नाकारत त्यांचे भाऊ सुनील कांबळे यांचे नाव निश्चित केले आहे. त्यामुळे त्यांची लढत आता माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याशी होत आहे. कॉंग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.
दरम्यान, भाजपच्या संभावित यादीत गिरीश बापट हे लोकसभेवर गेल्याने त्यांच्या जागी विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. तसेच शिवाजीनगर मतदारसंघात मागील पाच वर्षात सुमार कामगिरी राहिलेले विजय काळे यांच्याऐवजी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कॉंग्रेसकडून अद्याप संपूर्ण जागांवरील उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे कॉंग्रेस इतर ठिकाणीही लवकरचं नावे जाहीर करून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178550719005089792?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178550475647373312?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178544737348812800?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
