औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धमकीनंतर सातारा जिल्ह्यातील अफझलखानच्या कबरीभोवताल मोठी सुरक्षा करण्यात आली आहे. याठिकाणी रॅपिड अॅक्शन फोर्सचे (RAF) जवान तैनात करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवरच मनसे नेते सुमित खांबेकर (Sumit Khambekar) यांनी थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“एकीकडे महाराष्ट्रात साधूंना ठेचून मारलं जातं, दुसरीकडे औरंगजेब-अफजलखान यांच्या कबरींना बंदोबस्त दिला जातो…! कुठे नेवून ठेवला आहे स्व.बाळासाहेबांना अपेक्षित महाराष्ट्र?”, असा सवाल सुमित खांबेकर यांनी ट्वीट करत केला आहे.
एकीकडे महाराष्ट्रात साधूंना ठेचून मारलं जातं, दुसरीकडे औरंगजेब-अफजलखान यांच्या कबरींना बंदोबस्त दिला जातो…!
कुठे नेवून ठेवला आहे स्व.बाळासाहेबांना अपेक्षित महाराष्ट्र? pic.twitter.com/j7V4FLFE1j— Sumit Khambekar (@KhambekarSumit) May 26, 2022
दरम्यान अफझलखानची कबर महाबळेश्वरजवळ प्रतापगडाच्या पायथ्याशी असून AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी खुलदाबाद येथील मुघल सम्राट औरंगजेब यांच्या समाधीला भेट देत श्रद्धांजली अर्पण केली होती. त्यानंतर हा वाद सुरु झाला आहे. याप्रकरणी राज्य सरकारने ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. तर राज ठाकरे यांनी राज्य सरकारने योग्य पाउल उचलले नाही तर, मनसेकडून योग्य ती कारावाई केली जाईल. असा इशारा दिला होता.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 LSG vs RCB Eliminator : लखनऊचा खेळ खल्लास..! रजत पाटीदार ठरला बंगळुरूच्या विजयाचा हिरो
- IPL 2022 LSG vs RCB Eliminator : धमाकेदार पाटीदार..! लखनऊची धुलाई करत रजतनं रचला विक्रम; शतक ठोकलं आणि…
- IPL 2022 LSG vs RCB Eliminator : राहुलसेनेला एकटा भिडला ‘शतकवीर’ पाटीदार..! बंगळुरूचा लखनऊसमोर २०७ धावांचा डोंगर
- ICC Player Test Ranking 2022: फलंदाजीत विराटची १०व्या स्थानावर घसरण, तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा अव्वल; वाचा!
- IPL 2022 LSG vs RCB Eliminator : केएल राहुलनं जिंकला टॉस..! दोन्ही संघात ‘मोठे’ बदल; वाचा Playing 11!


