टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आज संगमनेरमध्ये महायुतीची सभा पार पडली. यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आता मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. मी संगमनेरमध्ये जास्त येऊ शकणार नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांना 24 ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्रात फिरायला नक्की मोकळं करू असं विधान केले आहे.
पुढे बोलताना सुजय विखे यांनी संगमनेर माझा आवडता जिल्हा आहे. या मतदारसंघात परिवर्तन होणार याची मला खात्री आहे. तसेच महायुतीची ही सभा संध्याकाळी झाली असती, तर लोकांनी घरे बंद करून सभेला गर्दी केली असती, असंही त्यांनी म्हटलं. तसेच आम्ही ठाकरे घराण्याचे उपकार विसरणार नाही, असं म्हणत विखेंनी उद्धव ठाकरेंना आपण दिलेल्या उमेदवाराचे प्रामाणिक काम करू असंही म्हणाले आहेत.
दरम्यान या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आज बऱ्याच वर्षांनी विखे पाटील आपण भेटलो, मला आज दोन्ही बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब विखे या दोघांची आठवण येते, राधाकृष्ण आपण पुन्हा आमच्याकडेला. मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण तुम्ही तिकडचे अनुभव सांगाल, तिकडे किती कर्मदरिद्री लोक आहेत असं विधान केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी ‘मी नवलेंना विचारलं समोर कोण आहे, तुम्हाला माहीत आहे का? ते म्हणाले की समोर बाळासाहेब थोरात असले तरी मी ‘जोरात’ आहे. हे (बाळासाहेब थोरात) म्हणाले मी बाजीप्रभू देशपांडे आहे, पण बाजीप्रभूंनी रक्त सांडलं यांनी काय सांडले? तुमची अक्कल उतू गेली आणि ती सांडली, थोरात साहेब तुम्ही देखील घरी बसायला हरकत नाही, कारण तुमचा नेता बँकाँकला बसला आहे असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181871309682139136?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181871109106364416?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

