Share

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची कार्यालयात आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये दोन महिलांसह एका व्यक्तीचे नाव

Published On: 

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील वडगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातच आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांना टेबलवरून एक सुसाईड नोट सापडली आहे.

दरम्यान, कार्यालयात कोणीही नसताना हणमंत दनाणे यांनी टोकाचे पाऊल उचलले. दणाने हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस होते. शनिवारी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान त्यांनी आपल्या कार्यालयात गळफास घेत आत्महत्या केली आहे.शशिकांत डोलारे नावाचा युवक साडे दहाच्या सुमारास कार्यालयात पोहोचला असता, ही घटना उघडकीस आली.

दनाणे यांच्या वडिलांना डोलारे यांनी याबाबत सांगितले असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाने केलेला प्रकार पाहून त्यांना मोठा धक्का बसला. यानंतर मृत दनाणे यांच्या वडिलांनी संबंधित घटनेची माहिती लोहारा पोलीस ठाण्याला कळवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

पोलिसांना पंचनामा करताना टेबलवर एक सुसाईड नोट सापडली. या नोटमधून आत्महत्येचं कारण उलगडलं आहे. गावातील मायादेवी दत्तात्रय गायकवाड, दत्तात्रय कचराप्पा गायकवाड, स्वाती दत्तात्रय गायकवाड यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!