टीम महाराष्ट्र देशा : प्रधानमंत्री फसल विमा योजना चांगला आहे, पण योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेत गोलमाल आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विमा कंपनीवर काढलेल्या मोर्च्यांचे स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाच्या कृषिमंत्र्यांनीसुद्धा ते मान्य आहे की, गडबड आहे. मुख्यमंत्र्यांचंसुद्धा स्टेटेमेंट आहे. मी त्याच्याकडे लक्ष वेधलं. या योजनेत दोन टक्के हिस्सा शेतकरी देतो आणि उरलेलं केंद्र आणि राज्य सरकार देतं. ज्या कंपन्या यासाठी सुविधा देत आहेत, त्यांचा एकही पैसा यात गुंतवता जात असेल असं मला वाटत नाही. शेतकऱ्यांकडून हप्ता घेताना या कंपन्यांचे दलला फिरतात, पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसानभरपाई देण्याची वेळ येते, तेव्हा गावात कुणी जात नाही. हे चुकीचे आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरावे लागले, असे ठाकरे म्हणाले.
पिक विमा कंपन्यांवर शिवसेनेने सत्तेत असून ही मोर्चे काढले होते. शिवसेनेच्या स्टंडनंतर विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. मात्र शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेतही शेतकऱ्यांच्या पिकविमा योजनेचा मुद्दा उचलून धरला होता.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181563809468567553?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181563432463556609?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181557575877160960?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

