टीम महाराष्ट्र देशा: मागील झालेला कमी पाऊस, उन्हाळ्यातील तीव्र अशी पाणी टंचाई आणि जनावरांकरिता वापरलेला ऊस, यामुळे जिल्ह्यातील उस उत्पादन घटले आहे त्यातून कारखान्यांना पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध होत, नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी कारखाने ऊस टंचाईमुळे अडचणीत सापडले आहेत.चालू वर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळविणे मोठे आव्हान बनले आहे. गाळपाची सरासरी गाठण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना झगडावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी १२०.८२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. चालू वर्षी उसाच्या टंचाईमुळे ते सुमारे ८२ लाख मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३५ लाख ८२ हजार मेट्रिक टनाने गाळप कमी होण्याचा अंदाज आहे.
पावसामुळे बहुतांशी पीक हातचे गेले आहे. काही ठिकाणचा ऊस गाळपायोग्य नाही. पावसामुळे नवीन ऊस लागवडी फार झालेल्या नसल्याने त्याचा विपरीत परिणाम क्षेत्र घटण्यावर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारामती, दौड, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यात ऊस क्षेत्रात घट झाली आहे. याचा फटका कारखान्यांना बसू लागला आहे.
जिल्ह्यात साखर पंढरी म्हणून ओळख असलेल्या बारामती, दौड, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील साखर कारखान्यांना गेटकेन ऊस घेतल्याशिवाय त्याचा गळीत हंगाम पूर्ण होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. दरवर्षी थोड्याफार फरकाने अशी स्थिती असते. परंतु, यंदा यांचे प्रमाण अधिक असणार आहे. यामुळे चालू वर्षी उसासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा होणार, हे गृहीत धरून कारखान्यांनी दर जाहीर करण्याकरिता अद्यापही हात आखाडता घेतला आहे.
पुण्यात एकूण १८ साखर कारखाने आहेत. यामध्ये सहकारी १२ तर ६ खासगी साखर कारखाने आहेत. त्यापैकी १५ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. यामध्ये खासगी साखर कारखान्यांकडून चांगले दर जाहीर करून गळीत हंगामासाठी अधिक ऊस मिळवू लागले आहेत. ही भीती सहकारी साखर कारखान्यांना सतावत आहे. गळीत हंगाम सुरू झाल्याने साखर आयुक्तांनी वेळापत्रकाप्रमाणे काउंटडाऊन सुरू केले आहे.
यावरूनच एकंदरीत साखर कारखान्यायांमध्ये उस मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण होणार आहे.यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की काय परिस्थिती आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

