Share

मध्यरात्री दोन वाजेपर्यंत खोतकरांच्या घरी ईडीचा मुक्काम; आज देखील चौकशी असणार सुरू

Published On: 

जालना : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर(Arjun Khotkar) यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी ही छापेमारी करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या यांच्या जालन्यामधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ED) शुक्रवारी सकाळी छापा टाकला आहे.

सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेला छापा थेट मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरूच होता. यादरम्यान, ईडीनं सखोल तपास केला असून आज देखील ही चौकशी सुरू असणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच छापा पडला, तेव्हा अर्जुन खोतकर घरीच असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित दोन उद्योजकांवर ईडीनं छापे टाकले होते. त्यानंतर किरीट सोमय्यांनी अर्जुन खोतकर यांना लक्ष्य केलं होतं.

दरम्यान, हा कारखाना खोतकर यांचे निकटवर्तीय जुगलकिशोर तापडिया यांना कागदोपत्री विक्री करण्यात आला. परंतु त्यासाठी देण्यात आलेली रक्कम अर्जुन शुगर्समधून देण्यात आली होती. जुगलकिशोर तापडिया यांनी त्यांच्या व्यवहारविषयक कागदपत्रात तसे मान्य केले आहे. १९८४ मध्ये जालना कारखाना उभारण्यात आला होता. दहा हजार सभासद असणाऱ्या या कारखान्याची मोठी जमीन असल्याने त्याच्या विक्रीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला जात होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!