उस्मानाबाद : जिल्ह्यातील वाघोली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे ऊस परिषद घेणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब, उस्मानाबाद या तालुक्यांसह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलेली खरिपाची पिकं वाहून गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. हे शेतकरी सध्या मदतीसाठी सरकारकडे आस लावून बसले आहेत. त्यामुळे ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे.
मराठवाड्यात झालेले नुकसान पाहता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यासोबतच उसाची एक रकमी एफ आर पी रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या सोबतच काही इतर लहान लहान मागण्या या शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्याकडे केलेल्या होत्या. याच अनुषंगाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी राजू शेट्टी हे आता मैदानात उतरणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी आता काय भूमिका घेणार? काय बोलणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. उद्या होणाऱ्या या कार्यक्रमास नुकसानग्रस्त शेतकरी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या संघटनेस उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केले आहे .
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खानला दिलासा नाहीच; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
- ‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या
- सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देऊन मंत्री छगन भुजबळ यांची कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना
- ‘वसुलीसाठी सरसावणारे हात मदतीसाठी मागे येतात’, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- लसीकरणाला गती देण्यासाठी सुरु करण्यात आलेले ‘मिशन कवच कुंडल’ अभियान नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

