Share

‘साखर उद्योगाने सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहू नये’ – केंद्रीय अन्नमंत्री पियुष गोयल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: शुक्रवारी साखर कारखान्यांची संघटना ‘आयएसएमए’च्या ८६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी केंद्रीय अन्नमंत्री पियुष गोयल यांनी या सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना साखर कारखानदारांना सल्ला दिला आहे.

साखर कारखानदारांनी सक्षम होण्याबरोबरच साखर उद्योगाने नफ्याचा व्यवसाय व बहुविध उत्पादने सादर करावे, असे आवाहन गोयल यांनी शुक्रवारी केले. साखर कारखान्यांना लागणाऱ्या ऊसाच्या किंमती कमी केल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या उद्योगाने सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहू नये, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं.

तर सध्या केंद्र सरकारच्या तीन कृषी कायदे रद्द करण्याच्य मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलना विषयी बोलताना गोयल यांनी हे आंदोलन डाव्या संघटनांच्या हातात गेल्याच वक्तव्य केल होत.

पुढे बोलताना २०२०-२१ करिता ६० लाख टन साखरेच्या निर्यातीकरिता केंद्र सरकारने देऊ केलेल्या ३,५०० कोटी रुपयांच्या अनुदानाचा निर्णय साखरेच्या अतिरिक्त साठा निर्मितीस पूरक ठरेल, असे मत गोयल यांनी यावेळी व्यक्त केले.

ऊसाच्या किंमती साखरेशी निगडित करण्याच्या या क्षेत्राच्या मागणीचा उल्लेख करत गोयल यांनी ते शक्य नसल्याचे स्पष्ट केले. साखर कारखान्यांनी इथेनॉलरसारखी अन्य उत्पादनेही घ्यायला हवीत, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!