Share

“अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप आणि घाणेरड्या वक्तव्यांमुळेच चर्चेत असतात”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अजित पवार यांची स्वतःची काहीही ताकद नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे त्यांना किंमत आहे, असं मत निलेश राणे यांनी व्यक्त केलं. तसेच अजित पवार यांनी बाता मारु नये, ते स्वतःच्या ताकदीवर साधा एक ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही. यावेळी त्यांनी आघाडी सरकार आल्यानंतर अजित पवार 1 वर्षभर शांत का बसले होते, असा सवालही केला.

राणे म्हणाले, “अजित पवार यांची स्वतःची ताकद काहीही नाही. बारामतीत जी ताकद आहे ती शरद पवार यांची आहे. शरद पवार यांनी बारामतीत ताकद निर्माण केली आणि टिकवली. अजूनही शरद पवार यांचं तिथं लहानलहान गोष्टींवर लक्ष असतं, त्यांचा पहारा असतो. अजित पवार यांनी त्यातील काहीही केलेलं नाही. त्यामुळे मी निवडून देतो असं श्रेय ते घेऊ शकत नाही. ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात अजित पवारांमुळे निवडून आला असा एकही आमदार नाही. त्यामुळे अजित पवार यांनी मोठमोठ्या वार्ता करु नये.”

राणे म्हणाले,“अजित पवार यांनी घोटाळे, सिंचन, बँका, घाणेरडी वक्तव्यं असं जे चित्र महाराष्ट्राला दाखवलं आहे ते महाराष्ट्र विसरलेला नाही. ते 5 वर्ष गप्प राहून मंत्रिपद उपभोगलं असतं तर काही वाटलं नसतं. अजित पवार स्वतःच्या ताकदीवर एक साधा ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही.”

“अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप आणि घाणेरड्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात”

राणे म्हणाले,“अजित पवार मागील 1 वर्ष काहीच बोलले नाहीत, आत्ता कुठंतरी बोलायला लागलेत. आघाडी सरकारला 1 वर्ष झाल्यानंतर लोकं मागचं विसरली असं त्यांना वाटत असेल. ते आज दुसऱ्या पक्षातील आमदारांना बोलावत आहेत, पण त्यांना 1 वर्षापूर्वी स्वतःच्या पक्षातील आमदार टिकवता आले नाहीत. अजित पवार यांचा इतिहास पाहिला तर लोकोपयोगी वास्तू किंवा कार्यक्रम दिसणार नाहीत.”

“भ्रष्टाचाराचे आरोप आणि वेगवेगळी वक्तव्ये यावरच ते चर्चेत असतात. ते समाजोपयोगी कामासाठी चर्चेत नसतात. त्यांना स्वतःच्या पक्षातील आमदार न टिकवता आल्याने तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकार सोडावं लागलं. ज्यांच्याकडे एकही आमदार राहायला तयार नव्हता ते अजित पवार आम्हाला आजही आठवतात,” असंही राणेनी नमूद केलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!