Share

राऊतांच्या ‘त्या’ इशाऱ्याला मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बाळासाहेबांना अटक करणाऱ्या…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी भाजपचे नेते सतत मला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल असं म्हणत आहे. तुमची इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण लक्षात ठेवा आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालादेखील यावं लागणार आहे. कारण तुमची पापं जास्त असा इशारा दिला होता, यावरच आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (BJP leader Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हातावर पोट चालत असलेला तुमच्यावर विश्वास टाकून मतदानासाठी दोन दोन तास रांगेत उभा राहतो, भारतमाता की जय म्हणतो आणि तुम्ही सौदेबाजी करता. आज महाराष्ट्र कुठे चालला आहे. सुडाच्या राजकारणाबद्दल बोलता आणि दुसरीकडे नारायण राणेंवर गुन्हा दाखल केला. बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) अटक करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसलात आणि आम्हाला तत्वज्ञान देता? असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

तसेच आम्ही जेलमध्ये गेल्यास तुम्हालाही टाकू असे वक्तव्य घटनेच्या चौकटीमध्ये गांभीर्याने घेतलं पाहिजे. याचा अर्थ आम्ही चुका करतो, तुम्ही दुर्लक्ष करा. देशाच्या स्वातंत्र्याचा मंगलकलश हा गुंडाराजसाठी दिला आहे का? उद्या कुणी कोणत्या पक्षाचा चुकत असेल तर आमची चौकशी थांबवा आम्ही तुमची करणार नाही ही वाटाघाडी जनतेला कशी पटणार आहे? एकमेकांच्या चुका पोटात घालायच्या आहेत का? असा सवालही मुनगंटीवार यांनी केला आहे. सध्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण म्हणणारी शिवेसना आता १०० टक्के राजकारण करत आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यासाठीची ही पत्रकार परिषद असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!